वार्ताहर/ सांबरा
बसवण कुडची येथे शनिवार दि. 26 ते 2 एप्रिलपर्यंत होणाऱया ग्रामदैवत श्री बसवेश्वर, श्री कलमेश्वर व श्री ब्रह्मदेव यात्रेनिमित्त शनिवारी काकती येथील डेंगरावरून इंगळय़ांची लाकडे आणण्यात आली.
शनिवारी पहाटे ग्रामस्थ बैलगाडी घेऊन काकती येथील डोंगराकडे रवाना झाले होते. सायंकाळच्या सुमारास इंगळय़ांची लाकडे घेऊन गावाकडे येताना ठिकठिकाणी आरती ओवाळून त्यांचे स्वागत करण्यात आले.
सोमवार दि. 28 रोजी सकाळी रुद्राभिषेक तर सायंकाळी 5 वाजता आंबील गाडय़ांची मिरवणूक निघणार आहे. यावेळी आंबील व घुगऱया वाटणे, गाडे पळविणे आदी कार्यक्रमांनंतर रात्री 10 वाजता पोवाडे व पूजा कार्यक्रम होईल. मंगळवार दि. 29 रोजी सकाळी धार्मिक पूजा तर सायंकाळी पाच वाजता इंगळय़ांचा कार्यक्रम तर रात्री नाटक व मनोरंजनाचा कार्यक्रम होईल. गुरुवार दि. 30 रोजी पाच वाजता कुस्त्या आणि सायंकाळी सात वाजता शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. 31 रोजी सायंकाळी पाच वाजता कुस्त्या होतील. शनिवार दि. 2 रोजी गुढी पाडव्यानिमित्त सकाळी मंदिरात अभिषेक कार्यक्रम व सायंकाळी पाच वाजता पंचांग पठणाचा कार्यक्रम होईल. बाल शिवाजी लाठी मेळा विविध कवायती सादर करणार आहे. त्यानंतर मनोरंजनाचा कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता होईल. भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा, असे मंदिर कमिटीने कळविले आहे.