वार्ताहर / सांबरा
बसवण कुडची येथे श्री कलमेश्वर, बसवाण्णा आणि ब्रह्मदेव यात्रेनिमित्त सोमवारी आंबिल गाडय़ांची मिरवणूक काढण्यात आली. प्रारंभी गाडय़ांची विधिवत पूजा करून हर हर महादेवाच्या गजरात आंबिल गाडे मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यानंतर आंबिल आणि घुगऱयांचे वाटप करण्यात आले. गावात व मंदिर परिसरात मिरवणूक काढून गाडे पळविण्यात आले. मंगळवारी सायंकाळी 5 वाजता इंगळ्य़ांचा कार्यक्रम होणार आहे.
किणये : मच्छे गावात आंबिल गाडय़ांची मिरवणूक मोठय़ा उत्साहात काढण्यात आली. सजवलेल्या बैलजोडय़ा घेऊन शेतकरी मिरवणुकीत सहभागी झाले होते. कोरोनामुळे यंदाची ही मिरवणूक साध्या पद्धतीने करण्यात आली. अण्णू पाटील यांच्या घराजवळून विधिवत पूजाअर्चा करून आंबिल गाडे मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. ही मिरवणूक कल्मेश्वर मंदिरामध्ये आल्यानंतर पूजा करण्यात आली. त्यानंतर महादेव मंदिराकडे मिरवणूक निघाली.