वार्ताहर /सांबरा
बसवण कुडची येथे मंगळवारी जीर्णोद्धारीत केलेल्या श्री मरगाई देवी मंदिराचा कळसारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
सकाळी 7 वाजता गावातील पंचांच्या हस्ते कलमेश्वर बसवेश्वर मंदिरापासून मंगल कलश व आरती घेऊन मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर बाहुबली बक्केडी, देवकी बक्केडी, अनिल चौगुले, पद्मा चौगले, कल्लाप्पा बेडका, सरस्वस्ती बेडका, प्रमोद चौगुले, रिया चौगुले, परशराम चौगुले, सरोज चौगुले, राजकुमार पाटील, विलासमती पाटील यांच्या हस्ते होमहवनचा कार्यक्रम झाला. त्यानंतर कळसारोहण करण्यात आले. विधिवत पूजा आरती करून महाप्रसादला सुरुवात करण्यात आली. यावेळी गावकऱयांनी देवीच्या दागिन्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली.आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. मिरवणूक वाजत गाजत व भंडाऱयाची उधळण करत गणपती मंदिर, विठ्ठल-रखुमाई गल्ली, मेन रोड, बस्ती गल्ली, बसवण गल्ली, गांधी गल्लीमार्गे मरगाई मंदिरकडे आली.
बसवण कुडची, देवराज कॉलनी, अलारवाड, निलजी, बसरीकट्टी, शिंदोळी, सांबरा, मुतगा, सुळेभावी परिसरातील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी गावातील नागरिक व पंच उपस्थित होते.