प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील डेनेज वाहिन्या तुंबण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून समस्येचे निवारण करण्यास महापालिका प्रशासनाला अपयश आले आहे. बसवाण गल्ली तसेच शहरातील विविध परिसरात डेनेज वाहिन्या तुंबण्यांची समस्या नागरिकांची डोकेदुखी बनली आहे. याकडे आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी साफ दुर्लक्ष केले असल्याने डेनेज चेंबर ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी गटारीमधून वाहत आहे.
डेनेज वाहिन्या तुंबण्याच्या समस्येमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. याला सर्वश्री महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. शहरातील डेनेज वाहिन्या घालून तीस वर्षाहून अधिक वर्षे झाली. तसेच लोकसंख्येमध्येदेखील वाढ झाली आहे. पण लोकसंख्येनुसार येथील डेनेज वाहिन्या बदलण्याची गरज आहे. मात्र याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी डेनेज वाहिनीमधून सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. यामुळे ठिकठिकाणी ड्रेनेज चेंबरमधून सांडपाणी वाहत आहे. शहरातील विविध भागात ही समस्या मोठयाप्रमाणात भेडसावत असल्याने याठिकाणी डेनेज वाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र शहराच्या मध्यभागी असलेल्या बसवाण गल्ली परिसरात ड्रेनेज वाहिन्याबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत. शहरातील गटारीचे सांडपाणी ड्रेनेज वाहिन्यांमध्ये सोडल्याने गटारीमधे टाकण्यात येणारा कचरा, प्लास्टिक पिशव्या आदी ड्रेनेज वाहिन्यामध्ये अडकून रहात आहेत. अशातच ड्रेनेज वाहिन्या लहान आकाराच्या असल्याने सांडपाण्याचा निचरा होणे मुष्किल बनले आहे. यामुळे बसवाण गल्लीतील डेनेज वाहिनी तुंबण्याची समस्या वारंवार निर्माण होत आहे. येथील जिजामाता बॅकेसमोरील ड्रेनेज चेंबर तुंबल्याने सांडपाणी ओव्हफ्लो होत आहे. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार करूनही याची दखल घेतली जात नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. डेनेज चेंबरमधील सांडपाणी गटारीमधून वाहत असून गटारी कचऱयाने भरल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. येथील समस्येचे निवारण कायमस्वरूपी करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.