प्रतिनिधी/ बेळगाव
बसवेश्वर सर्कल गोवावेस येथे महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसविण्याबाबत चर्चा करण्यासाठी दि. 13 रोजी सकाळी 10 वाजता शिवबसवनगर येथील लिंगायत भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी कारंजीमठाचे गुरुसिद्ध महास्वामी, हुक्केरीचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी, डॉ. प्रभाकर कोरे तसेच वीरशैव महासभेच्या जिल्हाध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद उपस्थित राहणार आहेत.