लांब पल्ल्याच्या बसेस स्थानकावर येत नसल्याने बोली लावण्याकडे व्यापाऱयांचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट परिसरातील कारवार बसस्थानकाचा विकास करण्यात आला आहे. येथील 6 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने ई-लिलाव प्रक्रिया राबविली होती. मात्र सदर बसस्थानकावर लांबपल्ल्यांच्या बस येत नसल्याने लिलाव प्रक्रियेकडे व्यावसायिकांनी पाठ फिरविली. दुसऱयांदा आयोजित करण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेतदेखील बोली लागली नाही.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रेल्वेस्थानकासमोरील बसस्थानकाचा विकास करण्यात आला आहे. सदर बसस्थानकाला कारवार बसस्थानक म्हणून ओळखले जाते. रामनगर, खानापूर, कारवार, पणजी, वास्को, हल्याळ अशा दक्षिण भागातील गावाला जाणाऱया लांब पल्ल्यांच्या बसेस याठिकाणी थांबतात. तसेच दक्षिण भागातील स्थानिक गावांच्या बसदेखील या ठिकाणी येऊन जातात. त्यामुळे बाजारपेठेत येणाऱया नागरिकांना हा बसथांबा सोयीचा आहे. पण या ठिकाणी असलेल्या बसथांब्यांची दुरवस्था झाल्याने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निधीची तरतूद करून विकास करण्यात आला. पण प्रारंभी विद्युत जोडणी करण्यात आली नसल्याने आणि कॅन्टोन्मेंटकडे हस्तांतर रखडल्याने बसस्थानकाचा वापर झाला नाही. हस्तांतरानंतर कॅन्टोन्मेंटकडून देखभाल केली जाते.
परिवहन मंडळाच्या कार्यालयासाठी इमारत बांधण्यात आली आहे. पण सदर इमारतीचा ताबा कॅन्टोन्मेंटने परिवहन मंडळाकडे दिला नाही. त्यामुळे परिवहन मंडळाने या ठिकाणी कार्यालय सुरू करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. पण याचा फटका प्रवाशांना बसत आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून निघणाऱया सर्व बसेस कारवार बसस्थानकावर न येता गोगटे चौकात थांबून परस्पर जात आहेत. त्यामुळे सर्व प्रवासी गोगटे चौकात थांबत आहेत. बसस्थानकाच्या परिसरात 12 व्यापारी गाळय़ांची उभारणी करण्यात आली आहे. यापैकी 6 गाळे यापूर्वीच्या भाडेकरूंसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. उर्वरित 6 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया आयोजित केली होती. पण याकडे व्यावसायिकांनी पाठ फिरविली आहे. बसची वर्दळ सुरू झाल्यानंतर गाळय़ांना भाडेकरू मिळण्याची शक्मयता आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटने या ठिकाणी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी होत आहे.