स्मार्ट सिटी योजनेंतर्गत नवीन दुभाजक घालणार
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत विविध रस्ते, गटारी, डेनेजचा विकास साधण्यात येत आहे. याबरोबरच बसस्थानकाच्या आवारातील विकास करण्यात येत आहे. बसस्थानकासमोरील प्रवाशांनी सतत गजबजणाऱया रस्त्यावरील दुभाजक शनिवारी हटविण्यात आला. हा रस्ता स्मार्ट सिटीअंतर्गत काँक्रिटीकरणाचा करण्यात आला आहे. शिवाय दुभाजकही नवीन घालण्यात येणार आहे. यासाठी जुना दुभाजक हटविण्यात आला.
स्मार्ट सिटीअंतर्गत तब्बल 31 कोटींच्या निधीतून सुसज्ज बसस्थानक उभारण्यात येत आहे. याबरोबरच सीबीटी-मध्यवर्ती बसस्थानक जोडण्यासाठी भुयारी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. बसस्थानक परिसरातील रस्त्यांचाही विकास करण्यात येत आहे. या रस्त्यावर असलेले जुने दुभाजक हटवून त्या ठिकाणी नवीन दुभाजक घालण्यात येणार आहे. बसस्थानकात स्थानिक प्रवाशांबरोबर लांब पल्ल्याच्या प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे परिसरात सतत गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे वाहतुकीबरोबर प्रवाशांना शिस्त लागावी, यासाठी या नवीन काँक्रीटच्या रस्त्यावर दुभाजक घालण्यात येणार आहे. यासाठी जुने दुभाजक हटविण्याचे काम हाती घेण्यात आले होते.