वार्ताहर/ उचगाव
बसुर्ते येथील जीर्णोद्धार करून नव्याने बांधण्यात आलेल्या नवग्रह ब्रह्मलिंग मंदिरामध्ये बसविण्यात येणाऱया नूतन बसवाण्णा मूर्ती व कळसाची मंगलवाद्यासह गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि या मंदिराच्या उद्घाटन समारंभाला रविवार दि. 3 जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे.
रविवारपासून शुक्रवार दि. 8 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रम या मंदिराच्या उद्घाटनानिमित्त आयोजित केले आहेत.
रविवारी दुपारी उचगाव येथील गुंडू लोहार यांनी रेखाटलेल्या बसवाण्णा मूर्तीची मंगलवाद्यासह बसुर्ते गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. भंडाऱयाची उधळण करत, मिरवणुकीसमोर बँड, बेंजो होता. कलशधारी महिला मिरवणुकीची शोभा वाढवत होत्या. गावामध्ये घरोघरी पाणी ओतून औक्षण घातले.
मंगळवारी संध्याकाळी मंदिरामध्ये रक्षोगण होम कार्यक्रम तर बुधवारी मंदिर वास्तुशांती व गृहप्रवेश, गुरुवारी मूर्तीन्यास व देणगीदारांचा सत्कार, शुक्रवारी मूर्ती प्राणप्रति÷ापना, धार्मिक विधी, कळसारोहण व उद्घाटन असा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमानिमित्त गुरुवारी व शुक्रवारी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे जीर्णोद्धार कमिटी व ग्रामस्थांनी कळविले आहे.