वार्ताहर / काकती
पावसाचा दर्शक डंडिकेटर, गोल्डन शॉवर ट्री म्हणून ज्या वृक्षाची ओळख आहे तो बहावा वृक्ष काकती, होनगा, दुर्गम भागातील जंगल व गावांमध्ये चांगला बहरला आहे. अंगुरांच्या झुपक्मयासारख्या दिसणाऱया पिवळय़ा फुलांचे सौंदर्य वेड लावणारे दिसून येते. यावरून यंदा पाऊस वेळेवर होणार असून तो अतिवृष्टी न करता पिकांना पोषक राहणार असल्याचे बोलले जात आहे.
काकती, होनगा भागातील गगेंनळ, हळ्ळेहोसूर, भुतरामहट्टी जंगल भागात व जिल्हय़ात नैसर्गिक बहावा चांगलाच बहरला असल्याचे पाहावयास मिळत आहे. हवामान खात्याने पाऊस वेळेवर होईल, असे सांगितले आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत कमी अधिक पाऊस होईल. संगणकीय युगात पाऊस कधी कमी, कधी जास्त होईल असे सांगणाऱया यंत्रणा मोठय़ा प्रमाणात प्रगत झाल्या आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी जाणतावर्ग अनेक गोष्टींवरून पाऊस लवकर येणार की उशिरा, याचा अंदाज आजही बांधत असतात. त्यात बहाव्याच्या फुलांचाही समावेश आहे. पावसाच्या आगमनाची चाहूल देणारा बहावा शेत शिवारात बहरला आहे.
अतिशय आकर्षक अशी पिवळय़ाधमक रंगाची फुले या बहाव्याला आली असून हे वृक्ष अनेकांचे लक्ष वेधून घेणारे ठरत आहेत. मार्च ते मे या कालावधीत बहावा बहरतो. बहावा वेळेवर फुलला असल्याने वळीव पावसानेही वेळेवर हजेरी लावली आहे. 25 मेपासून रोहिणी नक्षत्रास प्रारंभ झाला असून शेतकरी शेती मशागतीच्या कामाला लागला आहे. आयुर्वेदात बहावा या वनस्पतीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. काही ठिकाणी फुलांच्या परागीभवनानंतर वाटोळय़ापण लांबलचक शेंगा तयार झाल्या आहेत.
आयुर्वेदामध्ये या वृक्षाचे सर्व भाग औषधासाठी वापरले जातात, असा उल्लेख आहे. पानांच्या सेवनापासून मल मोकळा होतो, कफ दूर होतो, त्यांचा लगदा जंतुनाशक, कफनाशक, रेचक आणि वातनाशक आहे. शेंगांच्या लगद्याचा पोटावर सूक्ष्म प्रभाव पडतो. परिणामी दुर्बल व्यक्ती आणि गरोदर महिलांना तो विरेचक औषधी म्हणून देण्यात येतो, असे सांगण्यात येते.
अनेक आजारांवर या शेंगांचा वापर करतात. यंदा बहावा वेळेवर फुलल्याने पाऊस, पाणी चांगला होणार असल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत.