गोवाफॉरवर्डअध्यक्षविजयसरदेसाईयांचेआश्वासन
प्रतिनिधी/ म्हापसा
भाजपा सरकराने बहुजन समाजावर अन्याय केला आहे, मात्र बहुजन समाजाचे नेते पुढे आणणे गोवा फॉरवर्डचे ध्येय आहे. यासाठी आम्हाला आधार द्या. किरण कांदोळकर आता गोवा फॉरवर्डमध्ये दाखल झाले आहेत याचा त्यांना कधीच पश्चाताप होणार नाही. उलट वरिष्ठ पदाचा मान कांदोळकरांना गोवा फॉरवर्डमध्ये दिला जाईल, असे निवेदन गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी केली.
अस्नोडा येथे खास कार्यक्रमात कांदोळकर यांनी रितसर गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केल्यावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार जयेश साळगावकर, आमदार विनोद पालयेकर, प्रवक्ते दुर्गादास कामत, संतोष कुमार सावंत, अस्नोडा सरपंच शंकर नाईक, महिला उपाध्यक्ष रेणुका तसेच सरपंच व पंचसदस्य उपस्थित होते.
राज्याला पुन्हा मुक्तीची गरज आहे. भाजप बुडणारी नौका आहे. आता सर्वांनी एकत्रित येऊन भाजपला घरी पाठवायला पाहिजे. सागरमालाबाबत 137 मिलीयन टन कोळसा आणण्याचा विचार आहे. 580 लोक कोळसामुळे मेले. आज लहान मुले मरण पावली त्यांची जबाबदारी कोण घेणार? मुख्यमंत्र्यांना काहीच पडलेले नाही. गोवा राज्य त्यांनी विकायला काढला आहे, असे सरदेसाई पुढे म्हणाले.
कांदोळकरांची सतावणूक केल्यास खबरदार
किरण कांदोळकरांना पुन्हा पोलिसांनी बोलावून सतावणूक केल्यास सर्वांच्या फाईल्स रेडी आहेत. सर्वांवर केसेस दाखल होणार. दररोज डॉ. सावंत सेटींग करीत आहेत. त्यासाठीच काँग्रेसच्या आमदारांना भाजपमध्ये घेतले आहे. कोविडबाबत खोटी माहिती देऊन सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे. पक्ष श्रेष्ठी पार्लमेंटरी बोर्ड ठरविणार हे आमच्या पक्षात नाही. किरण कांदोळकर सांगतील त्यांनाच पक्षाचे तिकीट दिले जाईल. कांदोळकरांनी आपले जाळे वाढवावे. सर्व एकत्र होऊन पुढे जाऊया असे ते म्हणाले, असे सरदेसाई म्हणाले.
भाजपने थिवी मतदारसंघावर अन्याय केला : किरण कांदोळकर
2012 पासून भाजपने थिवी मतदारसंघावर अन्याय केला आहे. आपले आधारस्तंभ स्व. मनोहर पर्रीकर होते. लोकसभेत श्रीपादभाऊंना निवडून आणले आणि जे लोक आम्हाला भाजपचे म्हणून शिवीगाळ करीत होते त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. आज नेता कार्यकर्त्यांना ओळखत नाही. भाजपचे सदानंद तानावडे यांनी भाजपला मत दिले नाही ते आज भाजपचे अध्यक्ष आहेत. लोकाययुक्त भाजपच्या सरकारला भ्रष्टाचारी म्हणत आहे, असे किरण कांदोळकर म्हणाले. थिवीत दोन्ही ठिकाणी कांदोळकर हेच आमदार असतील असेही ते म्हणाले.
23 जागा जिंकण्याचे ध्येय : जयेश साळगावकर
साळगावचे आमदार जयेश साळगावकर म्हणाले की, किरण कांदोळकर काहीतरी बदल करणार याचे वारे सर्वत्र थिवी मतदारसंघात दाखवून दिले आहे. राज्यात गोवा फॉरवर्डच्या 23 जागा जिंकण्याचे ध्येय डोळय़ासमोर ठेवले आहे. थिवी मतदारसंघात पुन्हा एकदा बदल घडवून येणार आहे. त्यांच्याबरोबर साळगाव, शिवोली अन्य मतदारसंघात नवीन चैतन्य निर्माण झाले आहे. गोवा फॉरवर्ड पुढील सरकारचा मुख्य घटक असणार, असे ते म्हणाले.
तीन आमदारांचे 21 होतील : पालयेकर
शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर म्हणाले की, किरण कांदोळकरांच्या विजयाची नांदी झालेली आहे. आज आम्ही तिघेजण आहोत, आता 21 जण होण्यास उशीर लागणार नाही. सूत्रसंचासंचालन प्रशांत नाईक व प्रवीण बुगडे यांनी केले. स्वागत सरपंच शंकर नाईक यांनी केले.