जिल्हाधिकाऱयांना निवेदन – आरक्षणासह विविध मागण्या
प्रतिनिधी/ सातारा
बहुजन समाज पार्टीने आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी सातायात एक दिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन केले. यावेळी अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱयांचे पदोन्नतीतील आरक्षण कायम ठेवा, ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना देण्यात आले. यावेळी नगरसेवक श्रीकांत आंबेकर, बहुजन समाज पार्टीचे अमर गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, अनुसूचित जाती जमातीच्या कर्मचाऱयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाला कायम ठेवण्यात यावे, ओबीसींच्या आरक्षणाला अजिबात धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, शेतकऱयांच्या मालाला हमी भाव देण्यात यावा, पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्यात याव्यात, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्यात याव्यात, खाद्य तेलाचे भाव कमी करण्यात यावे, वाढत्या महागाईला कमी करण्यात यावे, कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे वीज बिल माफ करण्यात यावे, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना आर्थिक सहकार्य करण्यात यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.