बांगरपेट /प्रतिनिधी
बांगरपेट तालुक्याचे तहसीलदार चंद्रमौलीश्वर (वय 54) हे कोलारमधील बांगरपेट तालुक्यातील तोपनाहळ्ळी गावी जमिनीच्या पाहणीसाठी गेले होते. यावेळी जमिनीच्या मालकीबाबत सर्वेक्षक राम मूर्ती आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक व्यंकटचलपथी यांच्यात वाद झाला.
जमिनीच्या मालकीबाबत सर्वेक्षक राम मूर्ती आणि सेवानिवृत्त प्रधानाध्यापक व्यंकटाचलपाथी यांच्यात जोरदार वाद सुरु असताना तहसीलदार चंद्रमौलीश्वरांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस व्यंकटाचलपथीने तहसीलदारांवर वार केला. यामध्ये त्यांना आपला जीव गमवावा लागला. कोलार गोल्ड फील्ड्स (केजीएफ) चे पोलिस अधीक्षक सुजीता सलमान यांनी याविषयी माहिती दिली.
तहसीलदार यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात येत होते पण ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी या घटनेचा निषेध केला असून तहसीलदारांच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देणार असल्याचेही म्हंटल आहे.