वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शरीफने क्रिकेटमधील सर्व प्रकारातून निवत्तीची घोषणा शनिवारी केली. शरीफने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2007 साली खेळला होता.
2001 साली मोहम्मद शरीफने झिंबाब्वे विरूद्ध आपले वनडे क्रिकेट पदार्पण केले. त्याने 9 वनडे सामन्यात बांगलादेश प्रतिनिधीत्व करताना 10 गडी बाद केले. तसेच 2001 साली त्याने झिंबाब्वेविरूद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्याने 10 कसोटीत 14 बळी मिळविले. 34 वर्षीय मोहम्मद शरीफने आपल्या 20 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत 132 प्रथमश्रेणी सामन्यात 393 बळी मिळविले आहेत.