वृत्तसंस्था/ ढाका
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान बांगलादेशने न्यूझीलंडवर 2-0 अशी आघाडी मिळविली आहे. या मालिकेतील शुक्रवारी झालेल्या दुसऱया सामन्यात बांगलादेशने न्यूझीलंडचा केवळ 4 धावांनी पराभव केला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 20 षटकात 6 बाद 141 धावा जमविल्या. त्यानंतर न्यूझीलंडने 20 षटकात 5 बाद 137 धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशच्या डावामध्ये सलामीच्या नईमने 39 चेंडूत 3 चौकारांसह 39, दासने 29 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 33, शकीब अल हसनने 2 चौकारांसह 12, कर्णधार मेहमुदुल्लाने 32 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 37, नुरुल हसनने 1 चौकारासह 13 धावा जमविल्या. न्यूझीलंडतर्फे आर. रविंद्रने 22 धावांत 3 तर एजाज पटेल, बेनेट आणि मॅकेंची यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावात कर्णधार लॅथमने एकाकी लढत देत 49 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 65, रविंद्रने 1 षटकारासह 10, यंगने 3 चौकारांसह 22 आणि मॅकेंचीने नाबाद 15 धावा जमविल्या. बांगलादेशतर्फे शकीब अल हसन आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी 2 तर अहमदने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः बांगलादेश- 20 षटकात 6 बाद 141, न्यूझीलंड- 20 षटकात 5 बाद 137.