वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेश संघ सध्या झिम्बाब्वे दौऱयावर असून त्यांचा अ फलंदाज व यष्टिरक्षक मुश्फिकुर रहीम कौटुंबिक कारणासाठी मायदेशी परतणार असल्याचे बांगलादेश क्रिकेट मंडळाने सांगितले.
तो झिम्बाब्वेहून थेट ढाक्याला पोहोचणार असून प्रसिद्धीमाध्यमांनी त्याच्या प्रायव्हसीचा विचार करून त्याच्यापासून दूर रहावे, असे आवाहन बीसीबीने केले आहे. 34 वर्षीय रहीमला आता तीन सामन्यांची वनडे मालिका हुकणार असून हे सामने 16, 18, 20 जुलै रोजी होणार आहेत. त्यानंतर होणाऱया टी-20 मालिकेतही तो खेळणार नसून त्याला तशी परवानगी देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.