वृत्तसंस्था/ ढाक्का
येत्या जानेवारी महिन्यात बांगलादेशचा क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयात उभय संघात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळविली जाणार आहे. आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियन्सशीपमध्ये या लढतींचा समावेश असेल.
बांगलादेशचा संघ डिसेंबरअखेरीस न्यूझीलंडला प्रयाण करणार आहे. उभय संघातील हे कसोटी सामने टॉरेंगा आणि ख्राईस्टचर्च येथे खेळविले जातील, अशी माहिती बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने दिली. उभय संघातील पहिली कसोटी 1 जानेवारीपासून सुरू होईल तर दुसऱया कसोटीला 9 जानेवारीपासून प्रारंभ होईल.
दरम्यान पाकचा क्रिकेट संघ टी-20 मालिका खेळण्यासाठी शनिवारी ढाक्यात दाखल झाला आहे. बांगलादेश-पाक यांच्यातील टी-20 मालिकेला 19 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. या मालिकेनंतर या दोन संघात आयसीसी कसोटी चॅम्पियन्सशीपअंतर्गत 2 कसोटी सामने खेळविले जाणार आहेत. पहिली कसोटी 26 नोव्हेंबरपासून चित्तगाँवमध्ये तर दुसरी कसोटी 4 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
पाक टी-20 संघ- बाबर आझम (कर्णधार), शदाब खान, असिफ अली, फक्र झमन, हैदर अली, हॅरिस रौफ, हसन अली, इफ्तिकार अहमद, इमाद वासिम, खुशदिल शहा, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वासिम (ज्युनियर), सर्फराज अहमद, शाहिन आफ्रिदी, शहनवाज देहानी, शोएब मलिक, उस्मान कादीर.