ढाका : पुढील महिन्यात ओमान आणि संयुक्त अरब अमिरात येथे होणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी गुरूवारी 15 जणांचा बांगलादेश संघ जाहीर करण्यात आला असून अनुभवी गोलंदाज रूबेल हुसेनला राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.
या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी बांगलादेशचे नेतृत्व मेहमुदुल्लाकडे सोपविण्यात आले आहे. अलिकडेच बांगलादेश संघाची टी-20 प्रकारातील कामगिरी निश्चितच दर्जेदार होत असून त्यांनी गेल्या महिन्यात बलाढय़ ऑस्ट्रेलियाचा मायभूमीत 4-1 असा पराभव केला. त्यानंतर बांगलादेशने न्यूझीलंडलाही टी-20 मालिकेत पराभूत केले. 17 ऑक्टोबर रोजी बांगलादेशचा या स्पर्धेतील सलामीचा सामना स्कॉटलंडविरुद्ध होणार आहे.
बांगलादेश संघ – मेहमुदुल्ला (कर्णधार), मोहम्मद नईम, सौम्या सरकार, लिटॉन दास, शकीब अल हसन, मुश्फिकूर रहीम, अतिफ हुसेन, नुरूल हसन, मेहदी हसन, नासुम अहमद, मुस्तफिजुर रेहमान, एस. इस्लाम, टी. अहमद, सैफूद्दीन आणि शमीम हुसेन.