वृत्तसंस्था/ ढाक्का
आयसीसीच्या बक्षीस रकमेतील वाटा बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना दिला जात नसल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूं संघटनांच्या फेडरेशनने केला पण बांगलादेश क्रिकेट मंडळाने हा आरोप फेटाळला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या (आयसीसी) विविध स्पर्धांमध्ये खेळताना बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना बक्षीस रकमेतील वाटा दिला जात नसल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू संघटना फेडरेशनकडून करण्यात आला पण हा आरोप बिनबुडाचा आणि तथ्यहीन असल्याचे बांगला देश क्रिकेट मंडळाने म्हटले आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाकडून आतापर्यंत अशा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱया आपल्या क्रिकेटपटूंना बक्षीस रकमेतील वाटा तसेच जादाची बोनस रक्कम दिली आहे. आयसीसीतर्फे यापूर्वी झालेल्या सर्व स्पर्धांतील बक्षीस रकमेचा वाटा बांगलादेश क्रिकेटपटूंना दिल्याचे बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले. बांगलादेश प्रिमियर लीग स्पर्धेत सहभागी झालेल्या क्रिकेटपटूंना थकीत मानधनासाठी झगडावे लागत असल्याचे सांगण्यात आले.