ऑनलाईन टीम / ढाका :
पाकिस्ताननंतर आता बांग्लादेशातही कट्टरपंथीयांकडून हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे. खुलना जिल्ह्यातील शियाली, मल्लिकापुरा आणि गोवरा या गावात शेकडो कट्टरपंथीयांनी एकत्र येत 6 मंदिरांची तोडफोड करत 50 हून अधिक मुर्त्यांची विटंबना केली. तसेच 57 हिंदू घरांमध्ये घुसून लूटमारही केली. या घटनेत 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 6) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अल्पसंख्यांक हिंदू महिला भक्तांच्या गटाने धार्मिक यात्रा काढली होती. ही यात्रा पुरबा पारा मंदिर ते शियाली स्मशानभूमीर्यंत होती. वाटेत त्यांनी एक मशीद ओलांडली. त्यामुळे मशिदीतील मुस्लीम लोकांनी यावर आक्षेप घेतला. त्यावेळी हिंदू भक्त आणि इस्लामी धर्मगुरु यांच्यात वाद झाला. या वादाचे रुपांतर दंगलीत झाले आणि कट्टरपंथीयांनी 6 हिंदू मंदिरात प्रमाणात तोडफोड केली. या घटनेत 50 हून अधिक मूर्त्यांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दहा आरोपींना अटक केली आहे.