बांदा/प्रतिनिधी-
बांदा निमजगावाडी रोडवरील बांदेकरवाडीतील पूरग्रस्त नुकसानीची पाहणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांनी केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी संपूर्ण निमजगावाडी रोड परिसरातील बांदेकरवाडी, लक्ष्मी विष्णू अपार्टमेंट मधील घरात घुसल्याने त्यातील सामानाची, धान्य, कपड्याची नासधुस होऊन नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते यासंदर्भात भाजपा युवा सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष संदिप बांदेकर यांनी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांचे लक्ष वेधले होते.
या ठिकाणी काही घरांची मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याने पडझड होऊन नुकसान झाली होते. समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी याना सांगून पाहणी केली व त्यांनी तलाठी यांना पंचनामे करण्यास सांगितले. यावेळी या ठिकाणच्या दुकानांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांनी पाहणी करून शासनाकडून पूरग्रस्तांना मदत मिळवून दिली जाईल तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद समाज कल्याण विभागा मार्फत घरांची पडझड झालेल्या नुकसानीची त्वरित मदत केली दिली जाईल असे आश्वासन पूरग्रस्तांना दिले.
यावेळी झालेल्या नुकसानीची पाहणी करताना त्यांच्यासोबत भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष संदीप बांदेकर, बांदा ग्रामपंचायत सदस्य राजेश विर्नोडकर, सुविंद्र बांदेकर, ज्ञानेश्वर सावंत, अमित धुरी राजेश बांदेकर, महसूल कर्मचारी उपस्थित होते.