जिल्हाधिकाऱयांकडून आरोग्य यंत्रणेला अलर्ट राहण्याच्या सूचना
प्रतिनिधी / बांदा:
बांदा, दोडामार्ग परिसरात माकडतापाचे रुग्ण आढळण्याची शक्यता असल्यामुळे संशयितांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याचे नियोजन आठवडय़ातून किमान दोन दिवस करावे, तसेच पुणे येथून येणाऱया अहवालाना वेळ लागत असल्याने लवकरात लवकर अहवाल मिळण्यासाठी मणिपाल रुग्णालय प्रशासनाशी आरोग्य विभागाने चर्चा करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी येथे दिल्या. बांबोळी-गोवा रुग्णालयात सिंधुदुर्ग जिह्यातील रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिल्याच्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत. या संदर्भात आपण स्वतः गोवा प्रशासनाशी चर्चा करू, असे जिल्हाधिकाऱयांनी यावेळी सांगितले.
माकडताप व कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकाऱयांची आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसेकर, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, तहसीलदार राजाराम म्हात्रे, बांदा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील आदी उपस्थित होते.
बांदा आरोग्य केंद्र अंतर्गत यावेळी एकही माकडताप रुग्ण सापडला नाही. मात्र, काही वर्षांपूर्वी बांदा हे माकडताप साथीचे मुख्य केंद्र होते. मणिपालच्या साहाय्याने बांदा येथे रक्त तपासणी केंद्र उभारण्यात आले होते. मणिपाल हॉस्पिटलमध्ये केंद्र बंद केल्याने रक्त तपासणी नमुने हे आठवडय़ातून एक दिवस दर गुरुवारी पुणे येथे राष्ट्रीय विज्ञान संस्थेत पाठविण्यात येत होते. जिल्हाधिकाऱयांनी आठवडय़ातून सोमवारी व गुरुवारी असे दोन दिवस नमुने तपासणीसाठी पाठवावेत व त्यादृष्टीने आरोग्य विभागाने नियोजन करावे, अशा सूचना दिल्यात.
मणिपाल रुग्णालयातून रक्त तपासणी अहवाल हे तात्काळ मिळत होते. यासाठी मणिपाल व्यवस्थापनाशी चर्चा करून पुन्हा ही सुविधा सुरू करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱयांनी दिल्या. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात येणाऱया सुविधांचा जिल्हाधिकाऱयांनी आढावा घेतला. माकडतापाचे रुग्ण सातत्याने आढळत असल्याने आरोग्य यंत्रणेने अलर्ट राहून काम करावे, असेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.