नवी दिल्ली
रियल इस्टेट क्षेत्रात संस्थात्मक गुंतवणूक चालू वर्षातील एप्रिल ते जून या तिमाहीत साधारणपणे वर्षाच्या आधारे जवळपास 9 पटीने वाढून 1.35 अब्ज डॉलर्सवर पोहोचल्याची माहिती रिअल इस्टेट संदर्भातील सल्लागार फर्म जेएलएल इंडियाने दिली आहे. गेल्या काही कालावधीत प्रकल्पांमध्ये पैशांची देवाणघेवाण वाढल्याचा हा परिणाम असल्याचे जेएलएलने म्हटले आहे. जेएलएल इंडियाने आपल्या ‘कॅपिटल मार्केट्स’अहवालामध्ये संस्थात्मक गुंतवणूक 2021 वर्षातील दुसऱया तिमाही दरम्यान स्थिर मालमत्तांमध्ये 135.7 कोटी डॉलर्सची करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. मागच्या वर्षी समान तिमाहीत फक्त 15.5 कोटी डॉलर्सची संस्थात्मक गुंतवणूक या क्षेत्रात झाली होती. कोरोना संकटाच्या प्रभावामुळे कार्यालयांच्या बाजारात (कमर्शियल) मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक झाली. वर्ष 2021 च्या पहिल्या सहामाहीत कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या प्रभावामुळे 2.7 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे.