नवी दिल्ली
भारतीय बाजारात लवकरच नवी इलेक्ट्रिक स्कूटर दाखल होणार आहे. स्टार्टअप कंपनी बाऊन्स इनफिनिटीची पहिलीवहिली इलेक्ट्रिक स्कूटर पुढील महिन्यात म्हणजे 2 डिसेंबरला लाँच होणार असल्याचे समजते. या गाडीकरीता प्री-बुकिंग त्याचदिवशी सुरू होणार असून याकरीता ग्राहकांना आगाऊ 499 रुपये भरावे लागणार आहेत. मेड इन इंडियाअंतर्गत सादर होणारी स्कूटर आधुनिक साहित्य व आकर्षक वैशिष्टय़ासह येणार आहे.