बागणी / प्रतिनिधी
येथील काली मस्जिद जवळील चौगले मळा येथे वारणा कारखान्याचे हार्वेस्टिंग मशीन ऊस तोडणीसाठी आले असता या मशीनमध्ये अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने मोठा भडका उडाला. त्यामुळे मशीनने अचानक पेट घेतला. आग आटोक्याबाहेर गेल्याने आष्टा नगरपरिषदचे अग्निशमन बोलावण्यात आले होते. त्यांनी देखील विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पेट जोरात घेतला असल्याने व आगीचे लोळ मोठे असल्याने आग आटोक्यात आली नाही जवळपास तीन तास मशीन जळत होते. वारणा भैरेवाडी येथील आप्पा चव्हाण यांची मशीन आहे. या हार्वेस्टिंग मशीनचे ५० लाखाच्या आसपास नुकसान झाले आहे.