वार्ताहर/ जमखंडी
बागलकोट जिल्हय़ात सोमवारी दोघांना कोरोनाबाधा झाल्याने एकूण कोरोना रुग्णांची संख्या 53 झाली असल्याचे जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. के. राजेंद्र यांनी सांगितले. बनहट्टीतील 20 वर्षाचा युवक रुग्ण क्रमांक 854 हा गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून परतला असून त्याला बाधा झाल्याचा अहवाल आला. रबकवी-बनहट्टीत एकही कोरोनाबाधित नसल्याने दोन दिवसांपूर्वीच लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली होती. सोमवारी बनहट्टीतील युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हा येथील पहिला रुग्ण ठरला.
बदामी तालुक्मयातील ठाणक शिरूर येथील 28 वर्षांच्या युवकाला बाधा झाल्याने तालुक्मयातील हा 17 वा रुग्ण ठरला. याला रुग्ण क्रमांक 688 च्या संपर्काने संसर्ग झाल्याचे कळते. बागलकोट जिल्हय़ातील बदामी तालुक्मयात 17, बागलकोट 15, जमखंडी 11, मुधोळ 9, बनहट्टी 1 असे एकूण 53 रुग्ण संख्या असून 1 मयत, 21 कोरोनामुक्त तर 31 जणांवर जिल्हा कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
सोमवारी 120 व्यक्तींच्या नमुन्याचा अहवाल आला. त्यापैकी 118 निगेटिव्ह, 2 पॉझिटिव्ह असून परत 52 व्यक्तींचे स्वॅब प्रयोगशाळेला पाठविण्यात आले. होमक्वारंटाईनमध्ये 938, वसतीगृहातून 426 क्वारंटाईन असून एकूण 4330 जणांचे नमुने पाठविण्यात आले. त्यापैकी 4211 निगेटिव्ह आले आहेत. जिल्हय़ात 12 कंटेन्मेंट झोन आहेत.