वार्ताहर/जमखंडी :
बागलकोट जिल्हय़ात गुरुवार दि. 3 रोजी 123 जणांना कोरोना बाधा झाली तर 79 रुग्ण बरे झाले व 1 बळी गेला असल्याने एकूण बाधित संख्या 6639 वर पोचली. तसेच आतापर्यंत 5631 जण कोरोनामुक्त झाले व एकूण बळी 77 झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. के. राजेंद्र यांनी दिली.
गुरुवारी बागलकोट तालुक्मयात 48, मुधोळ 22, जमखंडी 16, बदामी 15, हुनगुंद 10, बिळगी 10 व अन्य जिल्हय़ातील 1 असे एकूण 123 नवे रुग्ण आढळून आले.
आतापर्यंत जिल्हय़ात 64,947 व्यक्तींची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यापैकी 57,796 निगेटिव्ह, 6639 पॉझिटिव्ह, 77 बळी, 931 रुग्णांवर उपचार सुरू असून 203 व्यक्तींचा अहवाल येणे बाकी असल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.