वार्ताहर/ जमखंडी
बागलकोट जिल्हय़ात बुधवारी एकाच दिवशी 20 जणांना कोरोना झाल्याचे आढळून आल्याने एकूण संख्या 108 वर पोहचली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. के. राजेंद्र यांनी दिली.
सर्दी, खोकला, ताप असलेल्या बागलकोट येथील 54 वर्षाच्या पुरुषाला कोव्हिड बाधा असल्याचे आढळून आले तर रुग्ण क्रमांक 8709 च्या संपर्कात कलादगी येथील 42 वर्षाचा पुरुषाला. आंध्रप्रदेशहून परतलेल्या मुधोळच्या 26 वर्षाच्या तरुणाला, बागलकोट डेंटल कॉलेजच्या 22 वर्षाच्या युवकाला, मुधोळच्या 57 वर्षाच्या पुरुषाला, मुधोळच्या 8 वर्षाच्या मुलीला कोरोना बाधा झाल्याचा अहवाला आला.
रुग्ण क्रमांक 10638 च्या संपर्काने बदामी तालुक्यातील मणिनागरची 37 वर्षाची महिलेला, रुग्ण क्रमांक 12064 च्या संपर्काने मुधोळच्या 6 वर्षाच्या मुलग्याला, रुग्ण क्रमांक 10638 व्यक्तिच्या संपर्काने बदामी तालुक्यातील मणिनागर येथील 44 वर्षाचा पुरुष, 70 वर्षाचा वृद्ध, 9 वर्षाचा मुलगा, रुग्ण क्रमांक 11212 च्या संपर्काने 14 वर्षाचा मुलगा, 12 वर्षाची मुलगी यांना कोव्हिड बाधा झाली.
पुण्याहून परतलेल्या बागलकोट तालुक्यातील 9 वर्षाच्या मुलीला, 8 वर्षाच्या मुलीला, बागलकोट येथील 45 वर्षाच्या पुरुषाला, कल्याणहून परतलेल्या बेऊरच्या 32 वर्षाच्या पुरुषाला, रुग्ण क्रमांक 8709 च्या द्वितीय संपर्कात आलेल्या कलादगीच्या 28 वर्षाच्या महिलेला, 10 वर्षाच्या मुलीला, हैद्राबादहून परतलेल्या मुधोळ तालुक्यातील मुगळखोडच्या 29 वर्षीय युवकाला कोरोना बाधा झाली.
जिल्हय़ात अजून 703 अहवाल येणे बाकी असून आतापर्यंत 13023 जणांचे नमुने प्रयोग शाळेला पाठविण्यात आले. त्यात 12029 निगेटिव्ह, 208 पॉझिटिव्ह, 5 जणांचा मृत्यू, 123 जण बरे झाले. 80 रुग्णांवर जिल्हा कोव्हिड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हय़ात 20 कंटेन्मेंट झोन आहेत.