वार्ताहर/ जमखंडी
बागलकोट जिल्हय़ात शनिवारी 207 रुग्ण कोरोनामुक्त तर 88 जण कोरोनाबाधित झाले व दोघांचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. के. राजेंद्र यांनी दिली.
शनिवारी बागलकोट तालुक्यात 23, हुनगुंद 20, बदामी 18, मुधोळ 12, जमखंडी 8, बिळगी 7 असे एकूण 88 बाधित झाले. त्यामुळे बाधितांची संख्या 10,729 वर तर कोरोनामुक्त संख्या 9,632 व बळींची संख्या 107 वर पोचली आहे. 1 लाख 11 हजार 341 व्यक्तींची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी 98 हजार 541 निगेटिव्ह, 10,729 पॉझिटिव्ह आढळून आले. 988 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.