जमखंडी : बागलकोट जिल्हय़ात गुरुवार दि. 17 रोजी 671 रुग्ण कोरोनामुक्त तर 234 कोरोनाबाधित झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. के. राजेंद्र यांनी दिली. बाधित संख्या 8781 वर तर कोरोनामुक्त संख्या 7619 वर पोचली. बळींची संख्या 93 असून 1069 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी बागलकोट तालुक्मयात 57, जमखंडी 45, बदामी 41, हुनगुंद 41, मुधोळ 38, बिळगी 12 असे एकूण 234 बाधित झाले. आतापर्यंत जिल्हय़ात 85,881 व्यक्तींचे नमुने प्रयोगशाळेला पाठविण्यात आले. त्यापैकी 73,810 निगेटिव्ह, 8781 पॉझिटिव्ह आढळून आले तर 2783 व्यक्तींचा अहवाल येणे बाकी आहे.
Previous Articleपालिकेतल्या कर्मचायांसाठी राखीव बेड ठेवा
Next Article तेथ मी प्राकृता गुणविकारी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.