वार्ताहर/ जमखंडी
बागलकोट जिल्हय़ात सोमवार दि. 22 रोजी 6 जणांना कोरोना बाधा झाली असून एकूण बाधितांची संख्या 137 वर पोचली. यापैकी 100 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून 36 रुग्णांवर जिल्हा कोविड रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. के. राजेंद्र यांनी दिली.
महाराष्ट्र राज्यातून परतलेली बनहट्टीतील लक्ष्मीनगर येथील रहिवासी 57 वर्षाची महिला रुग्ण क्रमांक 9159, दिल्लीहून परतलेला गुळेदड्डचा टिचर्स कॉलनीतील 27 वर्षाचा युवक रुग्ण क्रमांक 9152, उत्तर प्रदेशहून परतलेली मुधोळ तालुक्यातील कुळ्ळोळ्ळीची 30 वर्षाची महिला रुग्ण क्रमांक 9155 यांना कोविड बाधा झाल्याचा अहवाल आला. तर बागलकोट नवनगर सेक्टर 36 चा रुग्ण क्रमांक 8714 च्या संपर्काने बदामी मंजुनाथनगरची 54 वर्षाची महिला रुग्ण क्रमांक 9153, 24 वर्षाची युवती रुग्ण क्रमांक 9153, 24 वर्षाचा युवक रुग्ण क्रमांक 9154 असे एकूण 6 जण सोमवारी बाधित असल्याचे आढळून आले. जिल्हय़ात आतांपर्यंत 10 हजार 125 जणांची तपासणी करण्यात आली आहे.