वार्ताहर/ जमखंडी
बागलकोट जिल्हय़ात शुक्रवार दि. 31 रोजी आणखी 88 जणांना कोरोना बाधा झाली असून एकूण बाधित संख्या 1679 वर पोचली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. के. राजेंद्र यांनी दिली.
बागलकोट तालुक्यात 18, बदामी 23, मुधोळ 29, जमखंडी 9, बिळगी 6, हुनगुंद 3 अशा एकूण 88 जणांना बाधा झाल्याचे आढळून आले. अद्याप 240 नुमन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. आतापर्यंत 23,515 व्यक्तींचे नमुने प्रयोगशाळेला पाठविण्यात आले. त्यापैकी 21,352 निगेटिव्ह, 1679 पॉझिटिव्ह, 47 बळी, 908 कोरोनामुक्त, 724 रुग्णावर उपचार सुरू आहेत. कंटेन्मेंट झोन 129 असून 8237 जणांची क्वारंटाईनमधून सुटका करण्यात आली. तेरदाळचा 55 वर्षांचा रहिवासी दवाखान्यात दाखल झाला असता त्याचा मृत्यू झाला असून एकूण बळींची संख्या 47 वर पोचली आहे.