जमखंडी : बागलकोट जिल्हय़ात दि. 13 व 14 रोजी स्नातकोत्तर व डिप्लोमा सामान्य प्रवेश परीक्षा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेबाबत सुरक्षेची सर्व दक्षता घेण्याची सूचना जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. के. राजेंद्र यांनी अधिकाऱयांना दिली. जिल्हाधिकाऱयांच्या सभागृहात परीक्षेच्या पूर्व तयारी बैठकीत ते बोलत होते.
बागलकोट येथील सरकारी मुलींच्या पदवीपूर्व विद्यालयात परीक्षा केंद्र असून स्नातकोत्तर 303 व डिप्लोमासाठी 311 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. केंद्रात आरोग्य तपासणी करण्यात येणार असून तातडीच्या सेवेसाठी रुग्णवाहिका व सॅनिटायझरची सोय करण्यात येणार आहे. यावेळी पदवीपूर्व शिक्षण खात्याचे उपनिर्देशक शशीधर पुजारी, अप्पर जिल्हाधिकारी महादेव मरगी, उपविभागीय अधिकारी एम. गंगाप्पा, तहसीलदार गुरुसिद्दय्या हिरेमठ आदी उपस्थित होते.