वृत्तसंस्था/ श्रीनगर
हिरो पुरस्कृत आय लीग फुटबॉल स्पर्धेतील रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात कोलकाताच्या बलाढय़ मोहन बागान संघाने रियल काश्मीर एफसी संघाचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव करून स्पर्धेच्या गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले आहे.
या सामन्यात मध्यंतरापर्यंत गोलफलक कोरा होता पण सामन्यातील 71 व्या मिनिटाला जोसेबा बेटीयाने बागानचे खाते उघडले. 73 व्या मिनिटाला नाओरेमने बागानचा दुसरा गोल नोंदवून रियल काश्मीरचे आव्हान संपुष्टात आणले. सामन्याच्या उत्तरार्धात रियल काश्मीरने गोल करण्याच्या किमान दोन संधी वाया घालविल्या.