प्रतिनिधी / कोल्हापूर
महापालिकेने बागेसाठी आरक्षित ठेवलेल्या खुल्या जागेवर गेली तीस वर्षांपासून असलेले अतिक्रमण गुरूवारी उद्धवस्त करण्यात आले. या कारवाईत सहा मोठे शेड, चार टपऱया जेसीबीने काढण्यात आल्या तर तब्बल 625 कार हटविण्यात आल्या. शास्त्राrनगर कॉर्नर ते ओम गणेश चौक (राजर्षी शाहू महाराज पुतळा) या पांजरपोळ औद्योगिक वसाहतीच्या समोर असणाऱया रस्त्यालगतच्या खुल्या जागेत ही धडक कारवाई करण्यात आली. आजवर केवळ स्थानिक लोकप्रतिनिधींचा दबाव आणि राजकीय हस्तक्षेपामुळे या ठिकाणी अनेक जण महापालिकेच्या जागेचा वापर फुकटात करत होते. प्रशासक कादंबरी बलवकडे यांच्या आदेशानंतर इस्टेट विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभाग, राजारामपुरी विभागीय कार्यालय यांनी ही संयुक्त कारवाई केली. यावेळी राजारामपुरी पोलीस ठाण्याचा कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
शहरातील गोखले कॉलेजपासून राजारामपुरीच्या माऊली पुतळÎापर्यंत जाणाऱया मार्गावर शास्त्राrनगर कॉर्नर ते ओम गणेश चौक, राजर्षी शाहू महाराज पुतळा या रस्त्याच्या कडेला महापालिकेची तब्बल 50 फूट रूंदीची आणि तब्बल 100 ते 150 मीटर लांबीची खुली जागा आहे. महापालिकेने या खुल्या जागेत बागेसाठी आरक्षण टाकले आहे. पण आरक्षण टाकल्यानंतरही महापालिकेने बाग उभारणे, वृक्षारोपन करणे याकडे दुर्लक्ष केल्याने या ठिकाणच्या काही व्यावसायिकांनी लाभ घेतला. कार दुरूस्त करणाऱया गॅरेजसह कार विक्रीसाठी जत्रा भरविणाऱया मेकॅनिक, व्यावसायिकांनी या खुल्या जागेचा वापर सुरू केला. कार दुरूस्ती सुरू झाली.
काहीही टपऱ्या उभारल्या तर काहींनी चक्क मोठ मोठे शेड उभारले. जागा महापालिकेची आणि फुकटाचा वापर मात्र अतिक्रमण करणाऱयांचा अशी स्थिती निर्माण झाली. या अतिक्रमणाबाबत स्थानिक नागरिकांनीही तक्रारी केल्या होत्या. पण कारवाई होत नव्हती. ज्यावेळी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी कारवाईचा प्रयत्न करत तेंव्हा स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक दबाव आणत. अतिक्रमण करणारे आणि नगरसेवक यांच्या मिलिभगतमुळे कारवाई आजवर टळली होती. मात्र प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी तक्रारीचा आढावा घेताना काही दिवसांपूर्वी अचानकपणे या जागेची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी इस्टेट विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभाग, राजारामपुरी विभागीय कार्यालय यांना अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते.
मकरसंक्रांती दिवशी कारवाईची संक्रांत
गुरूवारी इस्टेट विभागाचे अधिकारी सचिन जाधव, राजारामपुरी विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता बाबुराव दबडे, कनिष्ठ अभियंता मिलिंद पाटील, प्रणिल पाटील, सव्हेअर गेजगे यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख पंडीत पोवार आदी अधिकारी आणि कर्मचाऱयांसह पोलीस बंदोबस्तात घटनास्थळी आले. दुपारी बारा वाजता कडेकोट पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू करण्यात आली. जेसीबीने शेड, टपऱया पाडण्यात आल्या. ज्या कार लावण्यात आल्या होत्या. त्या लावणाऱया मोटर्स कंपन्यांच्या मालकांना कार पेनने तत्काळ हटवा अन्यथा जप्त केल्या जातील, असा इशारा दिल्यानंतर संबंधित मोटर्स कंपन्यांच्या मालकांनी कार स्वतःहून हटविल्या. तब्बल तीन तास कारवाई सुरू होती. कोणताही विरोध झाला नाही.
पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून मारले खड्डे
अतिक्रमणावर कारवाई झाल्यानंतर खुल्या जागेत वृक्षारोपन करण्यासाठी जेसीबीने तातडीने खड्डे मारण्याचे काम सुरू करण्यात आले. पुन्हा अतिक्रम होऊ नये यासाठी हे खड्डे मारण्यात येत आहेत. या ठिकाणी महपालिकेच्या उद्यान विभागाकडून झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती पंडीत पोवार यांनी दिली.
महापालिकेच्या खुल्या जागेवर असणारी सर्व अतिक्रमणे काढण्याची मोहीम वेगाने सुरू आहे. अतिक्रमण केलेल्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढू कारवाईचा कटू प्रसंग टाळावा.
-सचिन जाधव, इस्टेट अधिकारी, कोल्हापूर महापालिका
रस्त्यावरील अतिक्रमण असो वा महपालिकेच्या खुल्या जागेवरील अतिक्रमण असो. प्रशासनाच्या आदेशानुसार त्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पांजरपोळ परिसरात असणारी इतर अतिक्रमणेही हटविण्यात येणार आहेत.
-पंडीत पोवार, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख