बेळगाव : बाग परिवारतर्फे कविवर्य कुसुमाग्रज जन्मदिन व मराठी भाषा दिनानिमित्त नुकताच कविता सादरीकरण कार्यक्रम पार पडला. शास्त्राrनगर येथील स्मिता किल्लेकर यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून किशोर काकडे, अध्यक्ष परशराम कामती, दीपक किल्लेकर व स्मिता किल्लेकर उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती फोटो पूजन झाले. दीपक किल्लेकर यांनी परिचय करून दिला. किशोर काकडे यांचा शाल, श्रीफळ व ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी किशोर काकडे म्हणाले, राजभाषा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. रोजच्या व्यवहारातही मराठी भाषेचा वापर व्यवस्थित व्हावा, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर बाग परिवारातील सहभागी कवींनी कविता, ललित लेख, गजल, एकपात्री अभिनय, कथा वाचन अशा विविध कलाविष्कारांचे सादरीकरण केले. भरत गावडे, स्वप्नील जोगाणी, अशोक सुतार, आनंद मेणशी, दिलीप सावंत, विश्वनाथ मुरगोडी, प्रशांत मणगुतकर, परशराम कामती, अपर्णा पाटील, रोशनी हुंदरे, विजया उरणकर, मनीषा नाडगौडा, अंजली देशपांडे, अस्मिता देशपांडे, प्रेमा मेणशी, धनश्री मुचंडी, अस्मिता आळतेकर, स्मिता पाटील, स्मिता किल्लेकर, डॉ. मेघा भंडारी आदींनी कविता सादर केल्या. याप्रसंगी बहुसंख्य रसिकश्रोतेही उपस्थित होते. प्रास्ताविक स्मिता किल्लेकर यांनी तर सूत्रसंचालन स्मिता पाटील यांनी केले. आभार अपर्णा पाटील यांनी मानले.
Previous Articleस्मार्ट सिटीची कामे करण्यास विलंब झाल्याने शहरात अनेक समस्या
Next Article हृदयाला भिडणाऱया साहित्याची गरज
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.