प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील विविध रस्त्यावर आणि चौकात खान मांडलेल्या भटक्मया जनावरांना पकडण्याची मोहीम महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे. ही मोहीम मंगळवारी बाजारपेठेत राबविण्यात आली. रामदेव गल्ली परिसरात वाहतुकीस अडथळा करणाऱया मोकाट जनावरांना पकडत असताना सदर जनावर सैराभैर होऊन धावू लागली यामुळे रामदेव गल्लीत एकच गोंधळ उडाला. मात्र मनपाच्या कर्मचाऱयांनी जनावराना पकडून गोशाळेत पाठविले.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार होत असल्याने आठवडय़ातून दोन दिवस ही मोहीम राबविण्यात येत आहे. शहरात विविध ठिकाणी ठाण मांडलेल्या जनावरांना जेरबंद करून गोशाळेत पाठविण्यात येत आहे. पण त्याठिकाणी दंड भरून जनावर मालक आपली जनावरे सोडवून घेत आहेत. त्यामुळे काही दिवसातच सदर जनावरे पुन्हा रस्त्यावर भटकत आहेत. परिणामी वाहनधारकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेकडून मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम निरंतरपणे सुरू ठेवण्यात आली आहे. प्रमुख रस्त्यावरील जनावरे पकडण्यात येत असल्याने ही जनावरे आता बाजारपेठेत भटकू लागली आहेत. त्यामुळे त्यांना पकडण्याची मोहीम मंगळवारी रामदेव गल्ली तसेच ठिकाणी राबविण्यात आली.