सेन्सेक्स 553 अंकांनी मजबूत : निफ्टी 12,263.55 वर स्थिरावला
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी तेजीची घोडदौड कायम राहिली आहे. चालू आठवडय़ातील शुक्रवारी दिवसअखेर सेन्सेक्स 553 अंकांनी वधारुन बंद झाला आहे. दुसऱया बाजूला विदेशी भांडवलाच्या प्रवाहाच्या प्रभावामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी तसेच एचडीएफसी बँक यांचे समभाग तेजीसह कार्यरत राहिले होते.
प्रमुख कंपन्यांची मजल राहिल्याने बीएसई सेन्सेक्स 552.90 अंकांनी निर्देशांक वधारुन 41,893.06 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 143.25 अंकांच्या मजबूतीसोबत 12,263.55 वर स्थिरावला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील सर्वाधिक नफ्यात 3 टक्क्मयांनी रिलायन्सचे समभाग तेजीत राहिले आहेत. सोबत बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, एचडीएफसी,एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांचे समभाग नफ्यात राहिले. दुसरीकडे मारुती सुझुकी, भारती एअरटेल, एशियन पेन्ट्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि नेस्ले इंडियाचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले.
जागतिक बाजारातील तेजीचा प्रभाव स्थानिक भारतीय भांडवली बाजारात राहिल्याने बाजार मजबूत स्थितीत राहिले आहेत. दुसरी महत्वाची घटना म्हणजे अमेरिकेतील निवडणूक निकालात असणारी काटेरी टक्कर यांचा प्रभावही जगातील राजकारण, अर्थकारण यासह अन्य क्षेत्रावर मोठय़ा प्रमाणात दिसतो आहे.
अन्य बाजारांमध्ये कोविडपूर्वची स्थिती प्राप्त होत असल्याचा लाभ गुंतवणूकदार घेत आहेत. परंतु दुसऱया बाजूला आशियातील बाजारात शांघाय नुकसानीत राहिला आहे. तसेच हाँगकाँग, सोल आणि टोकीयो नफा कमाईत राहिले आहेत. युरोपच्या प्रमुख बाजारांचा प्रारंभ मात्र घसरणीमध्ये राहिला आहे.
आंतरराष्ट्रीय ब्रेंट क्रूड तेल 1.93 टक्क्मयांच्या घसरणीसह 40.14 रुपये प्रति डॉलरवर राहिले. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 28 पैशाने मजबूत झाला.