सेन्सेक्स 109 तर निफ्टी 40 अंकांनी प्रभावीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात दुसऱया दिवशी मंगळवारच्या सत्रात सेन्सेक्स घसरणीसह बंद झाला आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील आणि आयसीआयसीआय बँकेसह अन्य कंपन्यांच्या घरसरणीवर भारतीय बाजार नाराज राहिला आहे. यामध्ये दिवसभरातील कामगिरीत सेक्सेक्सला 109 अंकांचा फटका बसला आहे. सर्व घडामोडींमध्ये जागतिक बाजारातील कलही कारणीभूत ठरला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीसोबत दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 109.40 अंकांनी घसरुन 0.18 टक्क्यांच्या नुकसानीसह 60,029.04 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 40.70 अंकांच्या नुकसानीसह 17,888.95 वर बंद झाला आहे.
समभागांची स्थिती
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्यांनी घसरुन बंद झाले आहेत. यासोबत टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इंडसइंड बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला मारुती सुझुकी, एनटीपीसी, टायटन, स्टेट बँक आणि लार्सन ऍण्ड टुब्रो यांचे समभाग मात्र लाभात राहिले आहेत.
जागतिक बाजार
मंगळवारच्या सत्रात जागतिक बाजारांमध्ये वातावरण शांत राहिले होते, याचा नकारात्मक परिणाम भारतीय बाजारावर झाल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये दिवसभरात चढउताराचा कल राहिला होता. परंतु अंतिम क्षणी बाजारात नुकसानीसह बंद झाला आहे. अन्य आशियाई बाजारात चीनचा शांघाय कम्पोजिट, हाँगकाँग आणि जपानचा निक्की हे घसरणीत राहिले आहेत. तर दक्षिण कोरियातील कॉस्पी लाभात राहिला आहे.
पेट्रोल-डिझेलची हालत
सर्वसामान्यांसह अन्य वर्गांनाही पेट्रोल-डिझेलचा फटका किमती वाढत असल्याचा प्रभाव होत आहे, यामध्ये सलग सातव्या दिवशीही इंधनाच्या किमती वधारत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांमध्येही भीतीचे वातावरण राहिल्याने त्याचा परिणाम शेअर बाजारात होत असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.