सेन्सेक्सची 59 अंकांची घसरण : हिंदुस्तान युनिलिव्हर नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
शेअर बाजारातील मागील पाच सत्रातील सलगची तेजी अखेर बुधवारी थांबल्याचे पहावयास मिळाली आहे. यामध्ये दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स 59 अंकांनी घसरुन बंद झाला आहे. जागतिक बाजारामधील वातवारणामुळे इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग घसरल्याचा प्रभाव देशातील बाजारावर राहिला आहे.
बुधवारच्या सत्रात 599 अकांवर चढउताराच्या कामगिरीनंतर दिवसअखेर सेन्सेक्स 58.81 अंकांनी घसरुन निर्देशांक 37,871.52 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी मात्र दिवसअखेर 29.65 अंकांनी घसरुन निर्देशांक 11,132.60 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरचे समभाग सर्वाधिक म्हणजे 3 टक्क्मयांनी घसरण झाली आहे. सोबत टाटा स्टील, इन्फोसिस, मारुती सुझुकी, इंडसइंड बँक, लार्सन ऍण्ड टुब्रो, एशियन पेन्ट्स आणि टीसीएसचे समभाग घसरले आहेत. मात्र अन्य कंपन्यांबाबत ऍक्सिस बँक, टायटन, पॉवरग्रिड कॉर्प, आयटीसी, एनटीपीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग नफा कमाईसोबत बंद झाले आहेत.
सलग पाच सत्रातील तेजीला विराम लावण्याचे काम चालू आठवडय़ातील बुधवारच्या सत्रात राहिले आहे. कारण दिवसभरात विविध समभागाच्या नफा कमाईने बाजार घसरला आहे. यासह जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतामुळे गुंतवणूकादारांनी काहीशी सावध भुमिका घेतल्याचे दिसून आले आहे. चीनचा शांघाय बाजार तेजीत तर जपान आणि युरोमधील प्रमुख बाजारांमध्ये घसरणीची नोंद करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय तेल मानक बेंट क्रूडचा वायदा भाव 0.74 टक्क्मयांनी घसरुन 43.99 डॉलरवर प्रति बॅरेल राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.