सेन्सेक्स 155 अंकांनी प्रभावीत- आयसीआयसीआय बँक, रिलायन्स नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ामध्ये सलगचा शेअर बाजारातील तेजीचा प्रवास अखेर खंडित झाला असल्याचे पहायवास मिळाला आहे. यामध्ये प्रमुख कंपन्यांपैकी, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. यामध्ये जागतिक शेअर बाजारातील वातावरणाचा प्रभाव राहिला असल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या जोरावर दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 154.89 अंकांनी घसरुन निर्देशांक 49,591.32 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 38.95 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 14,834.85 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीमध्ये बजाज फायनान्सचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्यांनी घसरले आहे. यासोबत अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग मात्र नुकसानीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला सन फार्मा, हिंदुस्थान युनिलिव्हर, टेक महिंद्रा आणि डॉ. रेड्डीज लॅब यांचे समभाग तेजीत राहिले आहेत.
आर्थिक कंपन्यांमधील विक्रीच्या दबावामुळे देशातील शेअर बाजारात घसरणीचे सत्र राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. आशियातील बाजारांच्या नकारात्मक वातावरणामुळे देशातील कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे ढग निर्माण झाले असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
सदरच्या दबावाच्या वातावरणामध्ये आर्थिक कंपन्यांच्या दबावात औषध कंपन्यांचे समभागा तेजीचा कल राहिला आहे. जागतिक पातळीवरील अन्य आशियातील बाजारात चीनचा शांघाय कम्पोजिट, हाँगकाँगचा हँगसेंग आणि दक्षिण कोरियाचा कॉस्पी नुकसानीत राहिला तर जपानचा निक्की हा तेजीत राहिला असल्याची नोंद केली आहे. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट कच्चे तेल 0.27 टक्क्यांनी नुकसानीसह 63.3 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले होते.
वाढत्या कोरोनाचा प्रभाव
देशामध्ये पुन्हा कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे शेअर बाजारासह अन्य आर्थिक क्षेत्र दबावाचा प्रवास करत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे आगामी काळात शेअर बाजाराचा प्रवास हा दबावामध्ये सुरु राहणार असल्याचे संकेत शेअर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केले आहेत.