ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील नागरिकांसाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आधारचा उपयोग होतो. मात्र, काही लोक खुल्या बाजारातून आधारकार्डची PVC प्रत काढतात. मात्र, ही प्रत वैध मानली जात नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारची प्रत बाजारातून मिळवणे टाळावे, असे यूआयडीएआयकडून सांगण्यात आले आहे.
यूआयडीएआयने केलेल्या ट्विटनुसार, खुल्या बाजारातून मिळणारी PVC आधार प्रत वापरण्याचा सल्ला यूआयडीएआयकडून दिला जात नाही. अशा PVC कार्ड्समध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसल्यामुळे PVC आधारची प्रिंटेड प्रत बाजारातून मिळवणे टाळावे. जर तुम्हाला PVC आधार कार्ड हवे असेल तर तुम्ही 50 रुपये भरून आधारच्या सरकारी एजन्सीकडून कार्ड ऑर्डर करू शकता. प्लास्टिक कार्ड किंवा आधार स्मार्ट कार्ड खुल्या बाजारातून बनवले असेल, तर ते वैध मानले जाणार नाही.
uidai.gov.in वरून डाउनलोड केलेले आधार / एम-आधार प्रोफाइल किंवा UIDAI द्वारे जारी केलेल्या PVC कार्डचाच तुम्ही व्यवहारात वापर करु शकता.