सेन्सेक्स 226 अंकांच्या तेजीसह निफ्टी 70 अंकांनी मजबूत
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने उच्चांकी पातळी गाठत आपला तेजीचा प्रवास कायम ठेवला असल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवसभरातील मुख्य घडामोडींमध्ये जागतिक पातळीवरील बाजारातील सकारात्मक संकेतामुळे भारतीय बाजाराने भक्कम स्थिती प्राप्त केली आहे.
दिग्गज कंपन्यांपैकी आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक आणि इन्फोसिसचे समभाग तेजीत राहिल्याने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 226.04 अंकांसह 0.43 टक्क्यांनी मजबूत होत निर्देशांक 52,925.04 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 69.90 टक्क्यांनी वधारुन निर्देशांक 15,860.35 वर स्थिरावल्याची नोंद केली आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीत सेन्सेक्समधील सर्वाधिक 4 टक्क्यांनी लाभात टाटा स्टीलचे समभाग राहिले आहेत. यासह ऍक्सिस बँक, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, लार्सन ऍण्ड टुब्रो आणि मारुती सुझुकीचे समभाग तेजीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, टायटन आणि एशियन पेन्ट्स यांच्यासह अन्य समभाग घसरणीत राहिले आहेत.
जागतिक पातळीवरील बाजारांपैकी आशियातील शांघाय, हाँगकाँग, सोल आणि टोकियो हे लाभात राहिले. दुसरीकडे देशात अनलॉक आणि वाढते लसीकरण यामुळे आगामी काळात बाजाराचा कल कोणत्या दिशेने प्रवास करणार हे पाहावे लागणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
तज्ञांच्या नजरेतून
जागतिक बाजारातील तेजीच्या प्रभावामुळे देशातील भांडवली बाजार सकारात्मक लाभात राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सीनेटच्या नियोजित प्रस्तावाचा स्वीकार केल्याचा सकारात्मक प्रभाव बाजारांवर पडला आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- टाटा स्टील…. 1165
- ऍक्सिस बँक….. 761
- स्टेट बँक………. 428
- आयसीआयसीआय 648
- मारुती सुझुकी 7643
- बजाज फिनसर्व्ह 12462
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1522
- भारती एअरटेल 535
- सन फार्मा……. 672
- इन्फोसिस….. 1574
- टेक महिंद्रा…. 1089
- आयटीसी…….. 205
- एचडीएफसी.. 2507
- इंडसइंड बँक.. 1009
- डॉ.रेड्डीज लॅब. 5311
- बजाज फायनान्स 6067
- एचडीएफसी बँक 1514
- एचसीएल टेक.. 995
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 794
- टीसीएस……. 3380
- अपोलो हॉस्पिटल 3438
- वेदान्ता……….. 263
- अशोक लेलँड…. 123
- कमिन्स……….. 857
- ग्लेनमार्क……… 647
- पीआय इंडस्ट्रीज 2886
- जेएसडब्लू स्टील 689
- कोल इंडिया….. 148
समभाग घसरलेल्या कंपन्या
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2104
- एनटीपीसी…… 116
- टायटन……… 1755
- एशियन पेन्ट्स 3003
- बजाज ऑटो… 4196
- नेस्ले……….. 17492
- अल्ट्राटेक सिमेंट 6919
- कोटक महिंद्रा. 1734
- पॉवरग्रिड कॉर्प. 230
- रिलायन्स इन्फ्रा.. 83
- डाबर इंडिया… 564
- कोलगेट…….. 1676
- मॅरिको 511