बजाज फिनसर्व्हचे समभाग 7 टक्क्यांनी तेजीत
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील सलग चौथ्या सत्रात गुरुवारी भारतीय भांडवली बाजारात तेजीचा कल कायम राहिल्याचे पहावयास मिळाले. यामध्ये जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाचा लाभ भारतीय शेअर बाजाराला मिळाला आहे. दिवसभरातील कामगिरीनंतर दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हलक्या तेजीसोबत बंद झाले आहेत.
एप्रिल महिना संपण्यासाठी अंतिम दोन दिवस राहिले असल्याने बाजारात चढउताराचे वातावरण राहिले होते. दिग्गज कंपन्यांच्या कामिगिरीसोबत ट्रेडिंगदरम्यान सेन्सेक्स 840 अंकांवर चढउतार करत राहिला होता. मात्र दिवसअखेर सेन्सेक्स 32.10 अंकांनी वधारुन निर्देशांक 49,765.94 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 30.35 अंकांनी वधारुन निर्देशांक 14,894.90 वर बंद झाल्याची नोंद केली आहे.
प्रमुख कंपन्यांपैकी बजाज फिनसर्व्हचे समभाग सर्वाधिक सात टक्क्यांनी मजबूत राहिले आहेत. या व्यतिरिक्त बजाज फायनान्स, ऍक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इंडसइंड बँक यांचे समभागही तेजीसोबत बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला बजाज ऑटो, एचडीएफसी, एचसीएल टेक आणि लार्सन ऍण्ड टुब्रो यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.
बाजार सावरण्याची कारणे
महिनाअखेर जवळ आल्याने अन्य प्रकारचे व्यवहार आटोपून घेण्यात गुंतवणूकदार व्यस्त असल्याच्या कारणास्तव मोठय़ा प्रमाणात चढउताराचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु बाजाराने आपली तेजी कायम ठेवण्यावर भर दिला असल्याचेही अभ्यासकांनी म्हटले आहे.
आशियातील बाजार तेजीत
दिवसभरातील कामगिरीनंतर प्रमुख क्षेत्रांपैकी धातू, आर्थिक आणि औषध कंपन्या वगळता अन्य प्रमुख निर्देशांक नुकसानीत राहिल्याची नेंद केली आहे. आशियातील अन्य बाजारातील शांघाय, हाँगकाँग आणि टोकीयो बाजार तेजीत राहिले.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- बजाज फिनसर्व्ह 11184
- बजाज फायनान्स 5484
- ऍक्सिस बँक…. 719
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2023
- इंडसइंड बँक… 939
- डॉ. रेड्डीज लॅब 5101
- सन फार्मा…… 644
- ओएनजीसी…. 104
- अल्ट्राटेक सिमेंट 6375
- हिंदुस्थान युनि 2409
- आयसीआयसीआय 621
- जेएसडब्लू स्टील 726
- वेदान्ता………. 254
- हिंडाल्को…….. 372
- अंबुजा सिमेंट.. 314
- बायोकॉन……. 393
- बंधन बँक……. 331
- ग्रासिम…….. 1350
- ज्युबिलंट फूड 2925
- अरोबिंदो फार्मा 967
- ग्लेनमार्क…….. 566
समभाग घसरलेल्या कंपन्या
- एचडीएफसी. 2531
- एचसीएल टेक. 909
- बजाज ऑटो.. 3834
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1358
- स्टेट बँक……… 359
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 774
- नेस्ले………. 16500
- एनटीपीसी….. 103
- आयटीसी……. 204
- भारती एअरटेल 541
- पॉवरग्रिड कॉर्प 220
- टीसीएस…… 3113
- एचडीएफसी बँक 1472
- कोटक महिंद्रा 1807
- टायटन…….. 1506
- एशियन पेन्ट्स 2613
- टेक महिंद्रा….. 976
- मारुती सुझुकी 6567
- इन्फोसिस…. 1355
- कमिन्स………. 858
- आयशर मोटर्स 2463