रिलायन्स, बजाजसह मारुतीचे समभाग नुकसानीत
वृत्तसंस्था /मुंबई
कोरोनाचा नवा संसर्ग सध्या डोके वर काढू लागला असून त्याचा परिणाम गुरूवारीही शेअर बाजारावर दिसला. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकाही काहीशा अंकांच्या घसरणीसह बंद झालेले दिसले. यातही गुरूवारी आयटी समभागांनी आपली चमक कायम ठेवली.
मागील काही दिवसांपासून ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असून या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली असल्याचे पहावयास मिळाले आहे. याचा परिणाम म्हणून भारतीय बाजारात काही प्रमाणात घसरण राहिली होती. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स आणि मारुती सुझुकी यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत. आयटी आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागामध्ये व्यवहार वाढल्याचे दिसले. वर्षाचा शेवट येत असल्यानेही याचा थोडा दबाव विविध कंपन्यांच्या समभागावर दिसून आला.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दिवसअखरे बीएसई सेन्सेक्स 12.17 अंकांनी घसरुन निर्देशांक 57,794.32 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 9.65 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 17,203.95वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग सर्वाधिक दोन टक्क्यांनी नुकसानीत राहिले असून यासोबतच टाटा स्टील, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, सन फार्मा आणि भारतीय स्टेट बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला एनटीपीसी, एचसीएल टेक, इंडसइंड बँक, टायटन, विप्रो आणि डॉ. रेड्डीज लॅब यांचे समभाग मात्र लाभासह बंद झाले आहेत. जागतिक बाजारांपैकी आशियातील अन्य बाजारात चीनचा शांघाय कम्पोजिट निर्देशांक आणि हाँगकाँगचा हँगसेंग लाभात राहिले आहेत. तसेच दक्षिण कोरियाचा कॉस्पी व जपानचा निक्की हे नुकसानीसह बंद झाले आहेत. युरोपीन बाजारात मिळता जुळता कल राहिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.68 टक्क्यांनी घसरले होते.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- एनटीपीसी……… 126
- एचसीएल टेक.. 1317
- टायटन………… 2446
- इंडसइंड बँक….. 884
- विप्रो…………….. 714
- डॉ.रेड्डीज लॅब… 4899
- टीसीएस………. 3733
- हिंदुस्थान युनि… 2326
- टेक महिंद्रा…… 1800
- एचडीएफसी बँक 1461
- पॉवरग्रिड कॉर्प… 205
- भारती एअरटेल.. 679
- इन्फोसिस…….. 1892
- एचडीएफसी…. 2572
- ऍक्सिस बँक……. 671
- आयसीआयसीआय 735
- बजाज होल्डींग्स 5172
- सिप्ला…………… 714
- एसबीआय लाईफ 1198
- ल्यूपिन………….. 939
- डाबर इंडिया…… 572
समभाग घसरलेल्या कंपन्या
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2356
- टाटा स्टील……. 1101
- मारुती सुझुकी.. 7284
- बजाज फायनान्स 6868
- स्टेट बँक……….. 451
- सन फार्मा………. 834
- अल्ट्राटेक सिमेंट 7395
- बजाज फिनसर्व्ह 16177
- आयटीसी……….. 216
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1887
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 830
- नेस्ले…………. 19358
- एशियन पेन्ट्स.. 3364
- कोटक महिंद्रा.. 1763
- आयजीएल……… 466
- वेदान्ता………….. 333
- मदरसन सुमी….. 215
- डिएलएफ………. 379
- जेएसडब्लू स्टील. 645
- युपीएल…………. 747
- एचपीसीएल 288