कोरोना संकटातही सकारात्मक कामगिरी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
चप्पल, बूट आदींची निर्मिती करणारी कंपनी बाटा इंडिया लिमिटेडने जून तिमाहीचे आकडे नुकतेच सादर केले आहेत. यामध्ये कंपनीला 69.47 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, अशी माहिती बाटा इंडियाने शेअर बाजाराला दिलेल्या आकडेवारीतून सांगितली आहे.
वर्ष 2020-21 च्या समान कालावधीत 100.88 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाल्याची नोंद केली होती. समीक्षकांच्या माहितीनुसार उत्पन्न हे जवळपास दुप्पट होत 267.04 कोटी रुपयांवर राहिले आहे. जे आर्थिक वर्ष 2020-21 मधील तिमाहीत 135.07 कोटी रुपये होते.
कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे आणि त्यानंतर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे किरकोळ दुकानदारांची विक्री खूप मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाल्याचे पहावयास मिळाले आहे. याच काळात ई-कॉमर्स प्लॅटफार्मच्या माध्यमातून विक्री मजबूत बनली आणि निर्बंधाच्या स्थितीतही तेजी पहावयास मिळाली आहे.
ऑनलाईनचा मिळाला आधार
बाटा इंडियाने वेबसाईट, ऑनलाईन मार्केट प्लेस, बाटा चॅटशॉप आणि बाटा स्टोअर ऑन व्हील्स यासारख्या पर्यायांच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा दिली आहे.