प्रतिनिधी /मडगाव
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अबकारी खात्याने सद्या बेकायदा दारू साठा करून ठेवणाऱयावर कारवाई करण्यास प्रारंभ केला असून लाखो रूपयांची दारू जप्त करण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. रविवारी रात्री वासवाडो-बाणावली येथे कारवाई करताना 9,71,461 रूपये किंमतीची दारू जप्त केली.
सासष्टी तालुका अबकारी पथकाने वासवाडो-बाणावली येथील अनधिकृत गोदामावर छापा टाकला असता, त्यांना मोठय़ा प्रमाणात विविध ब्रँडची दारू साठलेली आढळून आली. एकूण 3443.505 बल्क लिटरची दारु या गोदामात होती. तिची किंमत 9,71,461/-येवढी होत असून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सासष्टी तालुक्मयाच्या अबकारी पथकाने टाकलेला हा सलग दुसरा छापा आहे.
या पथकात अबकारी निरीक्षक शांबा नाईक, दुर्गादास नाईक आणि महेश्वर पै यांचा समावेश होता. आणि त्यांना अधिकारी गौरीश नाईक, औदुंबर पेडणेकर, यशवंत शेट, विजय पैंगीणकर व निवेद देसाई यांनी सहकार्य केले.