ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात शनिवारी 43,846 तर रविवारी 46,951 नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. मात्र, सोमवारी बाधितांच्या संख्येत किंचितशी घट झाली. मागील 24 तासात 40 हजार 715 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 199 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 16 लाख 86 हजार 796 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 60 हजार 166 एवढी आहे.
सोमवारी 29,785 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 12 लाख 81 हजार 253 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 3 लाख 45 हजार 377 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 4 कोटी 84 लाख 94 हजार 594 जणांना लस देण्यात आली आहे.
देशात आतापर्यंत 23 कोटी 54 लाख 13 हजार 233 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 09 लाख 67 हजार 459 कोरोना चाचण्या सोमवारी (दि.22) करण्यात आल्या.