ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी बाधितांच्या संख्येत 8385 रुग्णांची वाढ झाली. मागील 24 तासात 45 हजार 951 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 817 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 कोटी 03 लाख 62 हजार 848 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 3 लाख 98 हजार 454 एवढी आहे.
मंगळवारी 60 हजार 729 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 2 कोटी 94 लाख 27 हजार 330 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 5 लाख 37 हजार 064 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
देशात आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 33 कोटी 28 लाख 54 हजार 527 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.