सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश : नियमावली पाळण्याची सूचना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोनाबाधिताच्या घराबाहेर कोणतेही इशारा निर्देशक फलक (पोस्टर) लावू नये, असे निर्देश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. केंद्र सरकारने दिलेल्या दिशानिर्देशात अशाप्रकारचे फलक लावण्याचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून बुधवारी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करून यासंबंधीचे आदेश देण्यात आले.
आपल्या नियमावलीत किंवा मार्गदर्शक सूचनांमध्ये केंद्राने अशाप्रकारे कोरोनाबाधिताच्या घरावर आणि घराबाहेर फलक लावण्यासंदर्भात कुठेही उल्लेख केला नाही. पण अधिकाऱयांमार्फत आपत्ती निवारण अधिनियमांतर्गत विशिष्ट प्रकरणातच कोरोनाबाधिताच्या घरासमोर सूचना लावली जाऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. कोरोना रुग्णाच्या घरावर अशाप्रकारे आता फलक लावता येणार नाही.