अचूक बातमी “तरुण भारत”ची; मंगळवार 16 नोव्हेंबर 2021, स. 11.00
● सोमवारी अहवालात 23 नवीन बाधित
● एकूण 2 हजार 137 जणांची तपासणी
● जिल्ह्यात अल्प गतीने वाढ सुरूच
● पंधराव्या दिवशीही वाढ 50 च्या खाली
● सोमवारी 17,450 जणांनी घेतली लस
● एकूण लसीकरण 30 लाखाच्या दिशेने
सातारा / प्रतिनिधी :
गत चार-पाच दिवसात 29, 31, 27 अशी बाधित वाढ समोर आली होती. हा कोरोना बाधित वाढीचा आलेख खाली घसरत असून सोमवारी रात्री देखील आलेल्या अहवालात हा वाढीचा आलेख दिलासादायक घसरलेला होता. फक्त 23 नवीन बाधित आढळून आले आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून मृत्यू दराचा घसरलेला आलेख या सद्यस्थितीत नागरिकांच्या मनातील भीती कमी करणारा ठरला आहे.
पॉझिटिव्हिटी दर एक टक्के वर स्थिर
नोव्हेंबर महिन्याचा आरंभ जिल्ह्याला दिलासादायक ठरलेला आहे. मात्र गत पंधरा दिवसात एक तारखेची 50 बाधित वाढ सोडता गेली सलग 15 दिवस बाधित वाढ 50 च्या खाली राहिलेली आहे. यामध्ये एकदा 11 एवढ्या नीचांकी संख्येने नोंदवली गेली. मात्र त्यानंतर गत आठ दिवस झाले बाधित वाढ 20 ते 30 दरम्यान स्थिर असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दरही एक टक्के वर स्थिर आहे.
सोमवारी अहवालात 23 नवीन बाधित
प्रशासनाकडून सोमवारी रात्रीचा अहवाल मंगळवारी सकाळी देण्यात आला. यामध्ये एकूण फक्त 23 जणांचा अहवाल बाधित आलेला असून एकूण 2 हजार 137 जणांची तपासणी करण्यात आलेली आहे. यामध्ये पॉझिटिव्हिटी दर 1.08 एकच्या वर राहिलेला असून सध्या तरी जिल्ह्यात बाधित वाढीचा मोठा वेग मंदावला असला तरी अल्प गतीने सुरू असलेली वाढ थांबलेली नाही. काही तालुके कोरोना मुक्तही झालेले आहेत. मात्र तिथे अधून मधून एक अंकी संख्येने बाधित वाढ समोर येत आहे.
जिल्हा कोरोना मुक्तीच्या वाटेवर
एकूणच नोव्हेंबर महिन्याच्या आरंभापासून जिल्ह्यातील कोरोना स्थिती चांगलीच आटोक्यात आली आहे. बाधित वाडीचा मंदावलेला वेग, पॉझिटिव्हिटीचा मंदावलेला वेग आणि मृत्युदर खाली आल्याने जिल्ह्यातील भीतीचे वातावरण कमी झाले आहे. यामध्येच जगरहाटीने चांगलीच गती घेतली असून नागरिक भीतीमुक्त जीवन जगू लागले आहेत. यामध्येच पुन्हा दीपावली नंतर लसीकरणाने चांगलीच गती घेतली असून एकूण लसीकरणाचा आकडा आता 30 लाखाकडे जावू लागला आहे.
लसीकरण तीस लाखांच्या दिशेने
दैनंदिन 10 हजारांच्या पटीत सुरु असलेला लसीकरणाचा वेग रविवारी मंदावला होता. मात्र सोमवारी लसीकरणाचा वेग चांगला वाढला होता. दिवसभरात तब्बल 17 हजार 450 जणांनी लस घेतली आहे. यामुळे जिल्हय़ातील लस घेणाऱया नागरिकांची एकूण संख्या 29 लाख 31 हजार 834 एवढी झाली आहे. यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 19 लाख 85 हजार 444 एवढी झाली असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 9 लाख 46 हजार 390 एवढी झालेली आहे.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 22,64,670
एकूण बाधित 2,51,706
कोरोनामुक्त 2,44,053
एकूण मृत्यू 6,459
सक्रीय रुग्ण 332
सोमवारी जिल्हय़ात
बाधित 27
कोरोनामुक्त 15
मृत्यू 01